‘हात वर करुन मतदान करण्याची पद्धत आणली तरीही भाजपचं जिंकणार’

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागलेले आहेत. अनेक नेते विविध ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत. आपण केलेल्या कामाची पोचपावती जनतेला देत आहेत.

महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत मोठे विधान केले आहे. त्यांनी लोकांनी हात वर करुन मतदान करण्याची पद्धत परत आणली तरीही आम्हाला चालेल. लोक भाजपला भरभरून मतदान करतील असं विधान केले आहे. तसेच शरद पवार यांनी EVM ला दोष देऊ नये. लोकांच्या मनात नरेंद्र आणि देवेंद्र आहेत असंही पाटील म्हणाले आहेत.

पुढे बोलताना पाटील यांनी युतीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी युतीची सर्वस्वी जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. जागावाटपाबाबत सहमती झाली की योग्य वेळी जाहीर करतील. दोन्ही पक्षाचे नेते काय तो निर्णय घेतील,पितृ पक्ष आम्ही मनात नाही. अंधश्रद्धांना आम्ही पाळत नाही असंही पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, स्थानिक समस्यांवर आम्ही बोलत नाही तर ते सोडवतो. इतका मोठा दुष्काळ आम्ही सोडवला. विरोधी पक्षांनी आम्हाला प्रश्न समस्या सांगू नयेत असा टोलाही पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या