आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरून चंद्रकांत पाटील म्हणतात…

blank

टीम महाराष्ट्र देशा : संपूर्ण राज्याचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलेले पहायला मिळत आहे.

याविषयी चंद्रकांत पाटील यांनी दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केले आहे. त्यांनी ‘माझे वैयक्तिक मत आणि सल्ला असा आहे की, आदित्य यांना मुख्यमंत्री म्हणून समोर करून शिवसेनेतच त्यांना दुष्मन तयार केले जात आहेत. पक्षांतर्गत राजीनाराजी त्यावरून होऊ शकते. आम्ही इतकी वर्षे काम करतो, मग आमचे काय असा प्रश्न काही जणांकडून पक्षातूनच केला जाऊ शकतो. शेवटी मुख्यमंत्री कोणाचा याचा निर्णय भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील अस मत व्यक्त केले.

दरम्यान, या मुलाखतीत त्यांनी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीविषयी आपली भूमिका स्पष्ट केली तसेच पक्षांतर आणि जागावाटपासंदर्भात भाष्य केले आहे.