भाजपने भल्या-भल्या निवडणुका जिंकल्या; तेव्हा सांगली महापालिका’किस झाड की पत्ती’ – चंद्रकांत पाटील

chandrakant patil

टीम महाराष्ट्र देशा: भाजपने आजवर भल्या-भल्या निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे सांगली महापालिका निवडणूक ‘किस झाड की पत्ती’ अस म्हणत अवघ्या सहा महिन्यावर असलेली सांगली महापालिका निवडणूकीच बिगुल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आधीच वाजवल आहे.

आर आर पाटील यांच्या ताब्यात असलेली तासगाव नगरपालिका संजयकाकांनी ताब्यात घेतली. इस्लामपुरातील नगरपालिका जयंत पाटलांकडून ताब्यात घेतली. तसंच कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्याकडून पंचायत समिती ताब्यात घेतली. त्यामुळे पतंगराव आणि जयंतराव यांनी महापालिकेत लक्ष घालू नये. त्यांनी आपापली विधानसभेची जागा वाचवाव्यात असा इशारा सुद्धा चंद्रकांत पाटलांनी दिला.