‘युतीची चर्चा अंतिम टप्यात, लवकरचं घोषणा करू’

टीम महाराष्ट्र देशा : भाजप – शिवसेना युतीचं घोंगड गेले अनेक दिवस भिजत पडल आहे. मात्र आज युतीची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आज संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा करणार असल्याची माहिती होती परंतु आज ही घोषणा होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कारण या संदर्भात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी हि माहिती पत्रकार परीषेत घेवून दिली आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील बोलताना म्हणाले युतीची घोषणा लवकरच करू, युती संदर्भात उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्या मध्ये चर्चा सुरु आहे. युतीची चर्चा अंतिम टप्यात असून युतीची घोषणा लवकरच करू असे ते म्हणाले. याच वेळी त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात पत्रकाराने प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर मौन धारण केले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये अवघ्या 10 जागांमुळे मतभेद असल्याची सूत्रांची माहिती आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे. त्यामुळे या युतीची घोषणा कधी होणार हे पाहन महत्वाचं ठरणार आहे.