मोठी बातमी : अखेर ठरलं ! भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती

नवी दिल्ली : भाजपमध्ये नेतृत्वबदलाचे वारे वाहत असून आता महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर रावसाहेब दानवे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेव्हापासूनच ते प्रदेशाध्यक्षपद सोडतील, अशी चर्चा सुरू झाली होती.

Loading...

दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. स्वच्छ प्रतिमा आणि संघटनेत केलेलं काम यामुळेच त्यांची निवड करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. राज्यात आता काही काळातच विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम होणार आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद रिक्त न ठेवता लगेच भाजपने ही निवड जाहीर केली आहे.Loading…


Loading…

Loading...