Chandrkant Patil । मुंबई : सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये सतत आरोप-प्रत्यारोपांची खेळी रंगलेली पाहायला मिळत असते.अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांबाबत एक वक्तव्य केलं. “शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. काही दिवसात खरं, खोटं काय ते समोर येईल.” पवारांनी केलेल्या वक्तव्याला भाजप पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील ( Chandrkant Patil )
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला 100 दिवस झाले आहेत. स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार आणि नाना पटोले याबाबत भाष्य करत आहेत. मात्र अजुनपर्यंत काहीही झालेलं नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील ( Chandrkant Patil )यांनी चांगलंच अजित पवार यांना फटकारलं आहे.
शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना अजित पवार यांनी म्हटलं होतं की, सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला नकोत. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही.
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील राज्य सरकारवर सडकून टीका केलीय. जिल्ह्यातील लोकांच्या काय समस्या आहेत. जिल्ह्यात काही विकास काम बाकी आहेत का हे पहाणं तिथल्या पालकमंत्र्यांची जबाबदारी असते. मात्र सध्याच्या सरकारमध्ये एकाच मंत्र्याकडे पाच ते सहा जिल्हांचा कारभार देण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्ये ते प्रत्येक जिल्ह्यावर कसं लक्ष देणार?, असा खोचक सवाल करत जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Rane | भास्कर जाधव बिनकामाचा बैल तर जयंत पाटलांचा हवेत गोळीबार – निलेश राणेंची टीकेची तोफ
- ओ वाचवा…वाचवा..! ड्रायव्हर त्रास देतोय ! पुण्यात बसमध्ये प्रवाशाचा गोंधळ ; VIDEO व्हायरल
- APJ Abdul Kalam Birth Anniversary | ‘अयशस्वी म्हणजे अपयश नाही’ असा संदेश देणारे, डॉ. अब्दुल कलाम यांची आज जयंती
- Shalini Thackeray | ‘कांदे बाई’ उल्लेख करत शालिनी ठाकरेंनी किशोरी पेडणेकरांची उडवली खिल्ली
- Breaking News | साईबाबा यांची निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयाने नाकारली ; फडणवीसांच्या प्रयत्नांना यश आल्याचे भाजपचे ट्वीट