माजी खासदार म्हणाल्याने खैरे संतापले, म्हणाले…

blank

टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांना एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी पराभूत केले होते. त्यामुळे हा पराभव खैरे यांच्या जिव्हारी लागला आहे. कारण एका कार्यक्रमादरम्यान माजी खासदार या उल्लेखाने ते चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

एका कार्यक्रमातील वक्त्यांकडून चंद्रकांत खैरे यांचा माजी खासदार असा उल्लेख करण्यात येत होता. यावर खैरे म्हणाले, “मी कार्यक्रमात आल्यापासून बघतोय माझा उल्लेख माजी खासदार म्हणून केला जातोय. काय माजी खासदार, माजी खासदाय लावलंय… मी आजही शिवसेनेचा नेता आहे आणि लोक माझ्याकडे त्यांची कामे घेऊन येतात असं विधान केले.

दरम्यान यावेळी बाजूलाच असलेले एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनीही खैरेंना टोला लगावला. जलील यांनी मी खासदार झालोय, याच्यावर अजूनही काही लोकांचा विश्वासच बसत नाही असं विधान करत खैरे यांच्या चिडण्याची खिल्ली उडवली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. त्यात शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील, रायगडमधून अनंत गीते, तर औरंगाबादमधून चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आहे.