‘लवकर युती करा, नाहीतर आमचे उमेदवार तयार आहेत’

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक २१ ऑक्टोबरला होणार आहे. तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष चांगलेच तयारीला लागलेले आहेत. अनेक नेते विविध ठिकाणी जाऊन प्रचार करत आहेत. परंतु भाजप आणि शिवसेनेतील जागावाटप अजून ठरलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते काहीसे गोंधळलेले आहेत.

भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर भाष्य करताना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. खैरे यांनी युती करायची असेल तर लवकर करून टाका, नाहीतर आमचे उमेदवार तयार आहेत असं विधान केले आहे. त्यामुळे युती झाली नाही तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार आहे असा इशारा खैरे यांनी भाजपला दिलं आहे.

Loading...

पुढे बोलताना खैरे यांनी उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनाने आदित्य साहेबांच्या नेतृत्वात नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी रात्र वैऱ्याची आहे. त्यामुळे युती करायची तर लवकर करा. मात्र, युतीमधील शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभा करू नका. आम्ही भाजपाच्या जागेच्या विरोधात शिवसेनेचा एकही उमेदवार उभा करणार नाही. पण युती करायची नसेल तर बीडच्या 6 जागांवर माझे उमेदवार तयार आहेत. त्यांनी युती तोडली तर आम्ही तयार आहोत अस विधान खैरे यांनी केले आहेत.

दरम्यान, बीडमध्ये शिवसेनेकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी चंद्रकांत खैरे यांनी उपस्थिती लावली यावेळी त्यांनी हे विधान केले आहे. या कार्यक्रमाला जयदत्त क्षिरसागर, डॉ. भारत भूषण क्षिरसागर यांच्यासह जिल्ह्यातील विविध अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
अर्जुन कपूरचा मलायका सोबतच्या नात्याबद्दल बोलतांना मोठा खुलासा ...
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार