…तर भाजप – मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत

टीम महाराष्ट्र देशा : राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन झाल्यानंतर पक्षाचे अधिवेशन घेण्याचे निश्चित केले आणि मनसेचा बहुरंगी झेंडाही त्यांनी बदलला. तसेच या अधिवेशनामध्ये त्यांनी पुत्र अमित ठाकरे यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश घडवून आणला तर पक्षाचा झेंडाही बदलला.

पूर्वी निळ्या, भगव्या आणि हिरव्या रंगात असलेला मनसेचा झेंडा आता पूर्णपणे भगवा बनला आहे. खालच्या बाजूला तपकिरी रंगात पक्षाचं नाव लिहिलेलं आहे. पण यात सर्वांत महत्त्वाची आणि उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या झेंड्यावर शिवकालीन राजमुद्रेची प्रतिमा आहे. मनसेच्या या नव्या झेंड्याचं अनावरण झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय विश्वात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

Loading...

मात्र दुसरीकडे मनसेचा झेंडा भगवा होताच भाजपकडून युतीचे संकेत आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप-मनसे या संभाव्य युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला मनसेच्या अधिवेशनाबाबत आणि मनसेच्या नवीन झेंड्याबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडली.

याबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतली याचे स्वागत आहे. पण परप्रांतीय लोकांवर अन्याय अत्याचार करणे हे भाजपला मान्य नाही. मनसेने आपली भूमिका बदलायला पाहिजे. हिंदुत्व व्यापक संकल्पना आहे. परप्रांतियांबाबत जर भूमिका बदलली तर भाजप मनसे एकत्र येऊ शकतात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले.

दरम्यान, ‘विचारात समानता असेल, तर युती होण्याची शक्यता बळावते. मनसेने देशहित आणि राष्ट्रहिताचे धोरण स्वीकारले, तर आम्हाला एकत्र येण्यास काहीच अडचण येणार नाही,’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाचा ध्वज बदलून भगवा रंग धारण करताच भारतीय जनता पक्षाने मनसेबरोबर आगामी काळात युती होऊ शकते, असे मुनगंटीवार यांनी दिले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार