मिशन चंद्रयान 2 : इस्रोचा विक्रम लँडरशी असणारा संपर्क तुटला

टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या चंद्रयान 2 या मोहिमेला धाक बसला आहे. चंद्रावर उतरण्यासाठी अवघे २.१ किलोमीटर अंतर बाकी असताना लँडर विक्रमशी इस्रोशी असणारा संपर्क तुटला आहे. चंद्रयान 2 मोहिमेत सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अखेरच्या १५ मिनिटांत ही घटना घडली आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ विक्रमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आहेत.

चंद्रयान रात्री एक वाजून ५५ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणार होतं. ३० किलोमीटर अंतरावर स्थिरावलेल्या लँडरने चंद्राच्या दिशेने कूच करताना ‘रफ ब्रेकिंग फेस’ या अडथळ्यावरही मात केली परंतु जसजसे लँडर चंद्राच्या जवळ पोहोचले आणि अवघे २.१ किलोमीटर अंतर बाकी असताना विक्रम कडून सिग्नल येणे बंद झाले आहे.

दरम्यान, जरी विक्रमशी असणारा संपर्क तुटला असला तरी ऑर्बिटरद्वारे मोहीमेचा बराचसा भाग पूर्ण करता येणार आहे. सध्या काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे भारताची ही मोहीम अयशस्वी झाली असं म्हणता येणार नाही. जर इस्रोचा विक्रमशी पुन्हा संपर्क झाल्यास ही मोहीम पूर्ण होणार आहे.