#चांद्रयान 2 : ‘विक्रम’ लँडर हे सुस्थितीत, संपर्क जोडण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु – इस्रो

टीम महाराष्ट्र देशा : इस्रोच्या मुख्यालयातून सर्वांना दिलासा देणारे वृत्त आले आहे. चांद्रयान 2चे ‘विक्रम’ लँडर हे सुस्थितीत आहे. अपघातनंतर कुठेही इजा झालेली नाही. त्यामुळे ‘विक्रम’ लँडरशी संपर्क तुटला असला तरी लँडर हे एकसंध असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. तसेच ‘विक्रम’शी संपर्क होणार नाही असं नाही, प्रयत्न सुरु आहेत, असेही इस्रोने सांगितले.

भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेने आता वेगळे वळण घेतले आहे. इस्रोच्या मुख्यालयाशी तुटलेल्या संपर्का नंतर चांद्रयान 2 च्या ऑर्बिटरनं लँडर विक्रमचा शोध घेऊन फोटो पाठवला आहे. त्यामुळे चांद्रयान 2 मोहिम पुन्हा नव्याने सुरु होईल अशी आशा सर्वाना वाटत आहे. इस्त्रोच्या वैज्ञानिकांकडून याबाबत प्रयत्न सुरूचं आहेत. मात्र १४ दिवसाच्या आता लँडर विक्रमशी संपर्क झाला तर हे मिशन पुन्हा नव्याने सुरु होईल अशी माहिती इस्रोने दिली आहे.

दरम्यान लँडरशी संपर्क तुटल्यानं मोहिमेला 5 टक्के इतकाच धक्का बसला आहे. तर 95 टक्के काम सुरू राहणार आहे. 5 टक्क्यांमध्ये लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांच्याशी संपर्क तुटला आहे. यामुळं चंद्राच्या पृष्ठभूमीची माहिती मिळणार नाही. मात्र ऑर्बिटरच्या सहाय्यानं इतर माहिती मिळत राहणार आहे. चांद्रयान 2 चा ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहणार आहे.