चंद्राकडे झेपवण्यास ‘चांद्रयान 2’ सज्ज, २२ जुलैला होणार प्रक्षेपण : इस्त्रो

टीम महाराष्ट्र देशा : भारताची महत्वकांक्षी मोहीम मानल्या जाणाऱ्या ‘चांद्रयान 2’ च्या प्रक्षेपणाची नवीन तारीख इस्त्रोने जाहीर केली आहे. येत्या २२ जुलै रोजी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ‘चांद्रयान 2’ चे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती इस्त्रोने प्रसिद्ध केली आहे.

काही दिवसांपूर्वी भारतच्या चांद्रयान 2 मोहिमेला तांत्रिक विघ्ण आले होते. त्यामुळे नियोजित ‘चांद्रयान 2’ चे प्रक्षेपण रद्द कारण्यात आले होते. भारताच्या या महत्वकांक्षी प्रक्षेपणाकडे साऱ्या देशाचे आणि जगाचे लक्ष लागले होते. मात्र तांत्रिक विघ्न आल्यामुळे चांद्रयान 2 मोहिमेची सुरवात नकारात्मक झाली आहे. मात्र आता चांद्रयान 2 चंद्राकडे झेपवण्यास सज्ज झाले आहे.

दरम्यान अवकाश संशोधनात भारत उत्तरोत्तर प्रगती कारत आहे. तसेच भारत हा जगात अवकाश संशोधन करणाऱ्या देशांपैकी एक महत्वाचा देश आहे. चांद्रयान 2 च्या लॉन्चिंग नंतर ५२ दिवसांनी ‘चांद्रयान-२’ चंद्रावर पोहोचणार होतं. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेत चांद्रयान 2 चंद्रावरील खनिज्यांचा, वातावरणाचा, आणि विशेष म्हणजे पाण्याचा शोध घेणार आहे. तसेच चंद्राच्या ज्या भूभागावर आत्तापर्यंत कोणीही संशोधन केले नाही, अशा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-२ उतरवणार आहे.