तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रशेखर रावच पुन्हा मुख्यमंत्री

टीम महाराष्ट्र देशा – तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून चंद्रशेखर राव यांनी आज शपथ घेतली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत TRS या राव यांच्या पक्षाने मोठे जनमत प्राप्त केले. त्यामुळे चंद्रशेखर राव हेच पुन्हा तेलंगणाचे मुख्यमंत्री बनणार हे नक्की होते.आज चंद्रशेखर राव यांनी स्वतंत्र तेलंगणाचे सलग दुसरे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तेलंगणाचे राज्यपाल ई.एस.एल. नरसिम्हन यांनी राव यांना गोपनियतेची शपथ दिली. तर मोहम्मद अली यांनाही उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
चंद्रशेखर राव यांच्या टीआरएस पक्षाने राज्यातील 119 जागांपैकी तब्बल 88 जागा जिंकल्या आहेत. टीआरएसला 46.38 टक्के मते मिळाली. गेल्या निवडणुकांत हे प्रमाण 34.04 टक्के होते. पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत इतर चारही राज्यातील मुख्यमंत्र्यांना आपली सत्ता गमवावी लागली आहे. त्यामुळे राव यांच्या कामगिरीवर तेलंगणा मधील जनता खुश असल्याचे दिसून येते.

You might also like
Comments
Loading...