Chandrashekhar Bawankule | नागपूर : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंदमुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. तर उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
अजूनही 20-25 आमदारांचा छुपं समर्थन आम्हाला असल्याचं बावनकुळे म्हणाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार दोन महिन्यात पडेल असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं होतं. यावर उत्तर देत बावनकुळे म्हणाले, आमचं सरकार पूर्ण वेळ चालणार. सरकार मजबूत असून आमची आताची 164 आमदारांची संख्या पुढे 184 पर्यंत जाईल.
“संजय राऊत यांनी काळजी करण्याची गरज नाही. अजूनही 20-25 आमदारांचा छुपं समर्थन आम्हाला आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये”, असंही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदारांना रेडे म्हणणं योग्य नाही. ज्या दिवशी तुम्ही त्यांना धनुष्यबाण दिले होते त्या दिवशी ते माणूस होते, शिवसैनिक होते, निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र आता ते तुमच्या हुकूमशाहीमुळे उद्ध्वस्त झाले, आता तुम्ही त्यांना रेडे म्हणत आहात. त्यांना लाखो लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांना रेडे म्हणणं लोकप्रतिनिधी आणि सामान्य जनतेचा अपमान आहे. आता संजय राऊत यांनी अशी भाषा सोडावी आणि पक्ष सांभाळावा.”
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “आमदारकी पदरात पाडण्यासाठी सुषमा अंधारे…”, शिंदे गटाची बोचरी टीका
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेच्या चौकशीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
- IND vs NZ | टीम इंडियाने 1-0 ने जिंकली न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिका
- Anil Parab | “किरीट सोमय्या हे नौटंकीबाज” ; फौजदारी गुन्हा दाखल करण्याची अनिल परबांची मागणी
- Chandrashekhar Bawankule | “उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबतही युती करु शकतात”; बावनकुळेंचा टोला