Share

Chandrashekhar Bawankule | “… म्हणून उद्धव ठाकरेंना पाण्यात, खिडकीत, जेवताना शिंदे दिसतात”, चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात

Chandrashekhar Bawankule | मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी वंचित समाजाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली.

उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाल्यामुळे ते दुसरं काही बोलत नाहीत. त्यांच्याकडे दुसरी कॅसेट नाही. म्हणून शिंदे शिंदे शिंदे सुरू आहे. मोगलांना संताजी धनाजी जसे पाण्यात दिसत होते तसे आता उद्धव ठाकरेंना फडणवीस-शिंदे दिसतात. खिडकीत बघतात तेव्हा त्यांना शिंदे-फडणवीस दिसतात, जेवायला बसतात तेव्हा शिंदे-फडणवीस दिसतात, कार्यकर्त्यांशी संबोधित करताना शिंदे-फडणवीस दिसतात, संताजी-धनाजी सारखा त्यांनी शिंदे-फडणवीसांचा धसका घेतला आहे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) यांनी लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरेंनी फेसबुकवर चालवलं होतं, ते कधीच मंत्रालयात गेले नाहीत, मंत्री निरुपयोगी होते, ते काय सांगणार, उद्धव ठाकरेंना मतं देणं म्हणजे काँग्रेसला मतं देणं आहे, उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे राष्ट्रवादीला मतं देणं आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21व्या शतकातील सर्वमान्य नेते असून आता ते जगातील महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखत आहे, त्यामुळे प्रकाश आंबेडकर मोदींवर टीका करत आहेत, असा टोला त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे. आंबेडकर यांनी कुणासोबत जायचं आणि नाही जायचं हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. ज्यांनी अडीच वर्षात काहीच विकास केला नाही. त्यांच्यासोबत आंबेडकर जाणार आहेत का याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now