Share

Chandrashekhar Bawankule | “मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील”; चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला

Chandrashekhar Bawankule | मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट असा वाद राज्यात निर्माण झाला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत.  त्यातच वेदान्त फॉक्सकॉन’नंतर टाटा-एअर बस प्रकल्प गुजरातला गेला आहे. राज्यात होणारे प्रकल्प बाहेर गेल्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)  यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातले प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातच परत गेले. आरटीआयमधून माहिती समोर आलीय. अठरा महिने मुख्यमंत्री राज्यात नसताना काय प्रकल्प येणार, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींवर देखील टीका केलीय. राहुल गांधी यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही असं बावनकुळे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, नितीन गडकरी, पियूष गोयल, नारायण राणे व इतर सर्व केंद्रीय मंत्री दोन-दोन लोकसभा क्षेत्रांत महिन्यातून एकदा जाणार आहेत. काँग्रेसला आता शेवटची घरघर लागली आहेत. त्यामुळं धावपळ करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अडीच वर्षांपूर्वी एकत्र आलेत. मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

बावनकुळे म्हणाले, आत्ताचे मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री 18-18 तास काम करत आहेत. कुठंला उद्योगपती पैसे गुंतवणार? उद्योग आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते. उपलब्धता पाहिजे.महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना इच्छाशक्ती नसल्याचं ते यावेळी म्हणाले. महाविकासआघाडी नेत्यांनी भांडाफोड करण्यापेक्षा आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात भाजप उत्तर देईल. खोटे बोलाल तर उत्तर देईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | मुंबई : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now