Chandrashekhar Bawankule | सांगली: आतापर्यंत चार प्रकल्प (Maharashtra Project) बाहेर गेले असता आता उर्जा उपकरण निर्मीती झोन (Energy Equipment Manufacturing Zone) प्रकल्प देखील मध्य प्रदेशला गेला आहे. याला भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांना जबाबदार ठरवलं असून त्यांच्यावर घणाघात केला आहे.
महाविकास आघाडीच्या अडिच वर्षांच्या काळातील चुकांमुळे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. पण त्याचे खापर मात्र आमच्या सरकारवर फोडण्यात येत आहे, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. राज्यात कोणताही उद्योग आणायचा असेल गुंतवणूक होऊ द्यायची असेल तर उद्योजकांशी बोलावं लागतं. त्यांच्या बैठका घ्याव्या लागतात. पण त्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत ना? उद्धव ठाकरे हे तर 18 महिने मंत्रालयात फिरकलेच नसल्याचं सांगत बावनकुळेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केलीय.
ते म्हणाले, उद्धव ठाकरे अडिच वर्ष मुख्यमंत्री होते. पण त्यांचा सर्व काळ काँग्रेस आणि शरद पवार यांना सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी काही घेणंदेणं नव्हतं. उद्धव ठाकरे बोलत नव्हते म्हणून त्यांना आमदार सोडून गेले. जर त्यांना आमदार सोडून जाऊन शकतात तर त्यांच्या काळात उद्योजक का सोडून जाऊ शकत नाहीत, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.
उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार घेऊन पक्ष चालवत आहेत. त्यावरून आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर चार लोकांशिवाय कोणी दिसणार नाही, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला. यावर आता ठाकरे गटाकडून काय उत्तर येतंय हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाडांचे बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप; म्हणाले, “ज्यांनी शिवाजी महाराजांच्या वडिलांविषयी…”
- T20 World Cup | इंग्लंडला मोठा धक्का, हारिस रौउफने केला ‘हा’ गडी बाद
- T20 World Cup | पाकिस्तान आणि इंग्लंडपैकी कोण जिंकणार ट्रॉफी?, एबी डिव्हिलियर्सने केली भविष्यवाणी
- Ajit Pawar | “…म्हणून मी शिर्डीच्या शिबिराला गेलो नाही”, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
- Sushma Andhare | विभक्त पती करणार शिंदे गटात प्रवेश; सुषमा अंधारे म्हणाल्या..