Share

Chandrashekhar Bawankule | “उद्धव ठाकरे आता अबू आझमी आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यासोबतही युती करु शकतात”; बावनकुळेंचा टोला

Chandrashekhar Bawankule | नागपूर : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होण्याच्या चर्चा होत आहेत. त्यातच मुंबईतील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर आले. या कार्यक्रमात दोघांनीही भविष्यातील राजकीय मैत्रीचे संकेत दिले. त्याबाबत नागपुरात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे.

ते म्हणाले , “उद्धव ठाकरे आता अबू आझमी  आणि असदुद्दीन ओवेसी यांची बैठक घेऊन त्यांच्यासोबतही युती करु शकतात.” आमचे सरकार मजबूत आहे. अजूनही 20 ते 25 आमदारांचं छुपं समर्थन आम्हाला आहे. त्यामुळे सरकार पाडण्याच्या भानगडीत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पडू नये, असंही बावनकुळे म्हणाले.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं. “राज्यपालांच्या वक्तव्यामुळे छत्रपतींची प्रतिमा किंचितही मलिन झाली असेल तर त्यांच्या वक्तव्याला समर्थन करण्याचं कारण नाही. मात्र, राज्यपाल ज्या दिवशीपासून महाराष्ट्रात आले ते छत्रपती शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्यावर गेले, छत्रपती शिवरायांबद्दलच्या वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांनी संवेदनशीलपणे काम केलं. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला धक्का बसेल अशी कोणतंही कृत्य त्यांनी केलेलं नाही आणि ते करुही शकत नाहीत”, असं बावनकुळे म्हणालेत.

पुढे ते म्हणाले, “शरद पवार आणि नितीन गडकरी यांचा गौरव करणं ठीक आहे. मात्र छत्रपतींबद्दल राज्यपाल बोलल्याने जो आकांडतांडव झाला, त्याबद्दल आम्ही कालच भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही सर्व छत्रपतींच्या विचारांवरच काम करत आहोत,” असं बावनकुळे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Chandrashekhar Bawankule | नागपूर : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात युती होण्याच्या चर्चा होत आहेत. त्यातच …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now