Chandrashekhar Bawankule | मुंबई : कर्नाटकातील बेळगाव येथील बागेवाडी येथे मंगळवारी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक केली. यावरुन महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका करत नामर्द असा उल्लेख केला आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सुनावलं आहे.
बावनकुळे म्हणाले, संजय राऊत हे तीन महिने जेलमध्ये राहून आले. त्यामुळे ते षंढ, मर्दानगी, रेडे अशा शब्दांची भाषा शिकून आले. कैद्यांची अशा प्रकारची भाषा असते. मात्र महाराष्ट्रातील जनतेला ही भाषा सहन होणार नाही.”
“कोणतीही अनुचित घटना देशाला किंवा महाराष्ट्राला परवडणारी नाही. मंत्री गेले नाहीत म्हणून सरकार षंढ आहे, धमक नाही, ही भाषा संजय राऊत यांना शोभत नाही”, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांना टोला लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, “मर्दानगी आणि सरकार चालवण्याची धमक शिंदे आणि फडणवीस यांच्यात कशी आहे, हे संजय राऊत यांना माहिती आहे. प्रत्येक गोष्टीचं उत्तर सामाजिक वातावरण बिघडवून मिळत नाही.” मागच्या अडीच वर्षात तुमचं सरकार होतं तर सीमा प्रश्नात त्यांनी काय भूमिका घेतली? असा खोचक सवाल बावनकुळे यांनी केलाय.
एसटी फोडणे, गाड्या फोडणे ही लोकशाहीची लक्षणे नाहीत. महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाला विनंती करणार आहे. हा खटला लवकरात लवकर निकालात निघाला पाहिजे, असं पत्र देणार असल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “हे नामर्द सरकार…” ; संजय राऊतांची शिंदे – फडणवीस सरकारवर जहरी टीका
- Health Care Tips | कोमट पाण्यामध्ये तूप मिसळून आंघोळ केल्याने मिळू शकतात शरीराला ‘हे’ फायदे
- Shambhuraj Desai | “संजय राऊत तोंड आवरा, पुन्हा आराम करायची वेळ..”; शंभूराज देसाईंची सडकून टीका
- Akshay Kumar | अक्षय कुमारच्या छत्रपतींच्या भूमिकेला नेटकऱ्यांचा विरोध, म्हणाले…
- Skin Care Tips | चेहऱ्यावरील पांढरे डाग दूर करायचे असतील, तर करा ‘हे’ घरगुती उपाय