Share

Chandrasekhar Bawankule | “राज्यपालांची चूक झाली, पण…” ; चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

Chandrasekhar Bawankule |  नागपूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे भाजपवर टीका होत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. “राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन अनेक वर्षे महाराष्ट्रात काम केलं. त्या दिवशी त्यांची चूक झाली पण त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन वातावरण तापलं आहे. यावर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका पुन्हा एका स्पष्ट केली. राज्यपालांची चूक झाली, त्यांना ठेवायचं की नाही हा अधिकार आम्हाला नाही. आमची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन साजरा केला गेला. परंतु खासदार उदयनराजे यांनी राज्यपालांविरुद्धच्या नाराजीमुळे या सोहळ्याला जाणं टाळलं. याविषयी विचारलं असता बावनकुळे म्हणाले की, “उदयनराजे असो किंवा आम्ही आमची सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही. मात्र, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना ठेवायचे की नाही हा आमचा अधिकार नाही. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन अनेक वर्षे महाराष्ट्रात काम केलं. त्यादिवशी त्यांची चूक झाली आहे. त्यांना ठेवायचे की नाही ठेवायचे हा आमचा अधिकार नाही. ज्यांना अधिकार आहे ते निर्णय घेतील.”

महत्वाच्या बातम्या : 

Chandrasekhar Bawankule |  नागपूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyar) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे भाजपवर टीका …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now