Share

Chandrashekhar Bawankule | “उद्धव ठाकरेंची सभा म्हणजे टोमणे सभाच असणार, अशाने महाराष्ट्राचं…”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल आहे. त्यामध्ये दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची कामं सुरू आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवाजीपार्कवर होणार आहे. अशातच भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे ?

उद्धव ठाकरे यांची जी सभा होणार आहे किंवा यापूर्वी ज्या सभा झाल्या त्या टोमणे सभा झाल्या. त्यामध्ये कधी ते महाराष्ट्राच्या हिताचं काही बोललेच नाही. पुन्हा टोमणे सभा होणार आहे, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बावनकुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे असे कार्यकर्ते आहेत, जे दिवसाचे 18 तास समर्पित आहेत. ते दोघेही नेहमीच विकासाबाबत विचार करतात. दसरा मेळाव्यात काय अपेक्षित आहे तर, महाराष्ट्राचा सकल विकास कसा होईल, महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर कसा पोहचेल. हे अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंतच्या दसरा मेळाव्यातील सभांमध्ये केवळ टोमणेच दिसले, टोमणे सभांनी महाराष्ट्राचं भलं होणार नाही.

तसेच,एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही जोडी जनतेच्या सेवेसाठी समर्पित आहे. विकासासाठी काम करणारं हे नव सरकार आलं आहे. ट्वेंटीट्वेंटी मॅच खेळणारं हे सरकार आहे. हे दोघेही सुपरमॅन आहेत, बुलेट ट्रेन सुसाट सुरू आहे. मी कधीही एकनाथ शिंदेंना पाहतो तर ते विकासाबाबतच बोलत असतात, महाराष्ट्राला क्रमांक एकवर कसं नेता येईल याबाबत बोलत असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून संधी मिळाली होती. महाराष्ट्रला क्रमांक एकवर नेण्यासाठी जे करायला हवं होतं ते केलं नाही. आता ते केवळ टोमणे सभा, कोणाचं नाव घेऊन उलटसुलट बोलणं सुरू आहे. गर्दीची चिंता नाही. एखाद्या कार्यक्रमास किती लोक येतात किती नाही याला महत्त्व नसतं. कार्यक्रमाची मर्यादा, उद्देश, योजना काय हे महत्त्वाचं असतं, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल आहे. त्यामध्ये दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची कामं सुरू …

पुढे वाचा

Marathi News

Join WhatsApp

Join Now