fbpx

रविदास मंदिर आंदोलन पेटले, भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक

टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने रविदास मंदिर हे अनधिकृत असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे रविदास मंदिर तोडण्याची कारवाई झाली आहे. तर दिल्लीमध्ये रामलीला मौदानावर भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून मंदिर कारवाई विरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याने भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना अटक करण्यात आली आहे.

दिल्लीमधील तुगलकाबाद येथील संत रविदास यांचे मंदिर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तोडल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला आहे. पंजाब,दिल्ली तसेच हरियानामध्ये याविरोधात आंदोलने केली जात आहेत. आंदोलन करणाऱ्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा देखील जाळला आहे.

तर रविदास मंदिर तोडण्याच्या विरोधात रामलीला मैदानात बुधवारी सायंकाळी दलित आंदोलक मोठ्या प्रमाणावर जमले होते. हजारो लोकांनी तोडलेल्या मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण मिळाले. त्यामुळे पोलसांनी लाठीचार्ज केला. जमावाला काबूत आणण्यासाठी हवेत गोळीबार केला असून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.