fbpx

आपण भाजपचा असा पराभव करू की ते सत्तेतच काय विरोधातही दिसणार नाही : रावण

टीम महाराष्ट्र देशा- भीम आर्मी नावाची संघटना उभी करणाऱ्या चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांची सहारनपूर तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. लवकर सुटका झाल्याने भाजप आपल्याला दलितांप्रती किती सहानुभूती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करेल यात काहीच शंका नाहीये, मात्र रावण यांनी तुरुंगातून सुटताच भाजपला आव्हान दिल्याने भाजपचा डाव त्यांच्यावरच उलटल्याचे चित्र आहे.

जेलमधून बाहेर येताच त्याने आपण भाजपचा असा पराभव करू की ते सत्तेतच काय विरोधातही दिसणार नाही असे विधान केले आहे. भाजपला हे खुलं आव्हान देत भाजपविरोधात मोठी आघाडी उघडण्याचा आपला इरादा स्पष्ट केला आहे.

सहारनपूर दंगलीप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (रासूका) अटक करण्यात रावण यांना अटक करण्यात आली होती. त्यांची गुरुवारी मध्यरात्री तुरुंगातून सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर येताच रावण यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सर्वोच्च न्यायालयाकडून कानउघाडणी होण्याच्या भीतीनेच आपली सुटका करण्यात आल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.