Share

Chandrashekhar Bawankule | “…त्यामुळे ते स्वत:ची उंची कमी करून घेत आहेत”, अजित पवारांना चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याबाबत गौप्यसोफ्ट केला आहे. याला आता भाजप (BJP) पक्षाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, अजित पवार खोटबोलत असल्याचा आरोप बावनकुळेंनी केला आहे.

यावेळी, अजित पवार यांनी बोलू नये. त्यांची आणि राज्यपालांची भेट नेमकी कधी झाली. हे त्यांनी आधी सांगावं. राज्यपालांबाबत असं खोटं बोलणं योग्य नाही. अजित पवार हे चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत. ते विरोधी पक्षनेते आहेत. अशा प्रकारे बोलून ते स्वत:ची उंची कमी करून घेत आहेत. त्यांनी उंचीचा विचार करून आणि भान ठेवून बोलले पाहिजे, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यपाल हे संविधानिक पद आहे. त्यांनी शिवरायांबाबत केलेले विधान योग्य नाही. हे सर्वांनी मान्य केले आहे. त्यांच्या विधानाचे कोणीही समर्थन करत नाही. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून ज्याप्रकारे त्यांच्याबाबत बोलण्यात तेही बरोबर नाही, असं देखील बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, राज्यपाल महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊनच काम सुरू केलं होते, हे त्यांनी अनेकदा त्यांच्या वागण्यातून दाखवून दिले आहे. स्वत: ते शिवनेरी गडावर जाऊन आले, त्यांनी अनेकदा शिवजयंतीच्या कार्यक्रमात भाग घेतला. त्यामुळे एका विधानावरून त्यांच्या वयावर त्यांच्या, वृद्धावस्थेवर बोलण्यात आलं, हे योग्य नाही. यापुढे कोणीही अशा प्रकार बोलू नये, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now