Chandrashekhar Bawankule | मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासांत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर अनेक नेते आक्रमक झाले असून भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे सर्वेसर्व शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे मागणी केली आहे.
यादरम्यान, शरद पवार यांना माझी विनंती आहे की, त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करावं, असं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी एक भावूक तसेच इशारा देत ट्विट केलं आहे. या ट्विटमधून कार्यकर्त्यांना विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली. कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाईचा निषेध म्हणून पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. एकूणच जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेले गुन्हे चुकीचे असल्याची भावना व्यक्त केली जात असून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४, मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत, असं जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मी पोलिसांना, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करते, माझ्यासोबत जे झालं त्यावरून आमदारांवर कलम लावा आणि मला न्याय द्या, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “आव्हाडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी” ; अजित पवार आक्रमक!
- Electric Car Update | देशात लवकरच येणार आहे सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
- Ashish Shelar | “चर्चगेटच्या गाडीत बसायचं आणि मुलुंड आलं का विचारायचं”; आशिष शेलारांचा आव्हाडांवर निशाणा
- Kirit Somaiya | “जितेंद्र आव्हाड ‘त्या’ प्रकरणावर माफी कधी मागणार?”; किरीट सोमय्यांचा सवाल
- World Diabetes Day | ‘या’ गोष्टी केल्याने नियंत्रणात राहू शकते डायबिटीज