Share

Chandrashekhar Bawankule | “… म्हणून तिन्हीही प्रकल्प त्यांच्याच हातून गेलेत”, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Chandrashekhar Bawankule | मुंबई : आतापर्यंत चार प्रकल्प (Maharashtra Project) बाहेर गेले असता आता उर्जा उपकरण निर्मीती झोन (Energy Equipment Manufacturing Zone) प्रकल्प देखील मध्य प्रदेशला गेला आहे. याला भाजप (BJP) नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांना जबाबदार ठरवलं असून त्यांच्यावर घणाघात केला आहे.

राष्ट्रवादीने सरकार हायजॅक केले होते.याची अस्वस्थता काँग्रेसचे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत. येत्या काळात पक्षप्रवेशाचे मोठे बॉम्बस्फोट होतील, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. काँग्रेस -राष्ट्रवादीचे नेते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता आहे, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे आता काँग्रेसचे संविधान स्वीकारायचेच बाकी राहिलेत. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचे विचार स्वीकारल्याने शिवसैनिक शिंदे गटात जात आहेत, असा टोला त्यांनी लगावला नवीन सरकारमध्ये फरक जाणवत असल्याचं लोक बोलतात. एक मुख्यमंत्री मंत्रालयात जात नव्हते, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

दरम्यान, आताचे मुख्यमंत्री हे मात्र 18 तास काम करत आहेत. महाराष्ट्र प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काम करत आहेत. जनतेला आपला वाटणारा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कार्यरत आहेत, असं देखील बावनकुळे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | मुंबई : आतापर्यंत चार प्रकल्प (Maharashtra Project) बाहेर गेले असता आता उर्जा उपकरण निर्मीती झोन (Energy Equipment …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now