चंद्रशेखर आझाद यांची मुंबई पाठोपाठ पुण्यातही सभा रद्द

पुणे: भीमआर्मीचे चंद्रशेखर आझाद हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत.मुंबईसह राज्यात वेगवेगळ्या शहरात सभांचे आयोजन करण्यात आले होते.त्यातील पहिली सभा २९ डिसेंबर रोजी मुंबईत जांबोरी मैदानात होणार होती.मात्र पोलिसांनी सभेला परवानगी नाकारल्याने ती सभा होऊ शकली नाही.त्यानंतर आज पुण्यात होणाऱ्या सभेलाही पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पुण्यात येताना पोलीस त्यांना रोखणार नाहीत, पण त्यांना पुण्यात सभा घेता येणार नाही, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

चंद्रशेखर आझाद आणि त्यांचे सहकारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान मालाडच्या हॉटेल मनालीमधून पुण्याच्या दिशेनं निघाले होते. जरी पोलिसांनी सभेला परवानगी नाकारली असली तरी पुणे ते भीमा कोरेगाव पायीयात्रा काढणार असल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले आहे.