गुन्हेगारांचं उदात्तीकरण होत असल्याचा आरोप करत बच्चू कडूंच्या संघटनेत उभी फुट

टीम महाराष्ट्र देशा : आमदार बच्चू कडू यांची संघटना ‘प्रहार’मध्ये फूट पडली असून त्यांच्या चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांनी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेत केंद्रीय नेतृत्वाकडून गुन्हेगारांना प्रोत्साहन दिले जात होते असा आरोप संघटना सोडलेल्यांनी केला आहे.

दरम्यान, बच्चू कडू यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. पप्पू देशमुख हे प्रहारचे जिल्हाध्यक्ष होते ज्यांनी नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच हा निर्णय घेत कडूंची डोकेदुखी वाढवली आहे. देशमुख यांनी दुसऱ्या पक्षात न जाता स्वत:चा पक्ष काढला आहे. ‘जन विकास सेना’ असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे.

गेल्या काही दिवसांत चंद्रपुरातील प्रहार संघटनेत नाराजी वाढली होती असं संघटना सोडलेल्यांचं म्हणणं आहे. संघटनेत केंद्रीय नेतृत्वाकडून गुन्हेगारांना प्रोत्साहन दिले जात होते असा आरोप संघटना सोडलेल्यांनी केला आहे. याच कारणावरून प्रहारच्या जिल्हा कार्यकारणीने राजीनामाही दिला होता. यानंतरही परिस्थितीमध्ये बदल न झाल्याने देशमुख यांनी राजीनामा दिल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. पप्पू देशमुख हे माजी नगरसेवक असून ते प्रहारकडून चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाले होते.

You might also like
Comments
Loading...