टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूरच्या जनतेचा राग महाडिक यांच्यावर असून महाडिकांना संपवण्यासाठीच पवारांनी धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वाघापूर येथे झालेल्या कोपरा सभेत बोलताना केला.
एका विश्वसनीय सर्व्हेनुसार शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार संजय मंडलिक सुमारे नव्वद हजार मताच्या पुढे आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये. पैसा, गाडी, सहली यासारखी वेगवेगळी आमिषे दाखवली जाणार. स्वाभिमानी मतदार या मोहाला बळी पडणार नाहीत. राहिलेले दिवस कार्यकर्त्यांनी डोळ्यात तेल घालून जागे राहून काम करावे असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.