पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून टीका-टिप्पणी सुरु असल्याचं कायम दिसून येत असतं. आता पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत जहरी टीका केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या संबोधनावर चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘चंद्रकांत पाटलांची लायकी नाही, ते भित्रे आहेत. त्यांना कोल्हापुरातून पळून जावं लागलं. यानंतर पुण्यात महिलेच्या जागेवर उभे राहावे लागते, यावरुन त्यांची लोकप्रियता कळते’ असा टोला हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.
हसन मुश्रीफ यांच्या या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी एका आव्हानाद्वारे प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दुसऱ्या जागी जाऊन निवडून येण्यासाठी धमक लागते. मुश्रीफ यांनी दुसऱ्या मतदारसंघातून निवडून यावं. कागलमध्ये ते मतांचं विभाजन करुन निवडून येतात. त्यामुळे, त्यांनी दुसऱ्या कुठल्याही मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं,’ असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोणी मास्क न घालता कारण देत असेल तर पुणे पोलिसांनी शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ दाखवाच !
- पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा सरकारने मध्यम मार्ग काढला; भाजप नेत्याने केले निर्णयाचे स्वागत
- ‘उद्धवसाहेब तुम्ही लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य द्या उद्योग जगत तुमच्या पाठीशी आहे’
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !