fbpx

धुळे महापौरपदी भाजपचे चंद्रकांत सोनार बिनविरोध

धुळे: धुळे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज मनपा सभागृहात विशेष सभा पार पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांचे अर्ज मागे घेत भाजपच्या चंद्रकांत सोनार यांना महापौर पदासाठी तर उपमहापौर पदासाठी कल्याणी अंपाळकर यांना पाठिंबा दिला. यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे.

या निवडणुकीत भाजपने ७४ पैकी ५० जागांवर निर्विवाद विजय मिळविला होता. पालिका स्थापनेच्या इतिहासात कुठल्याही पक्षाला इतक्या  बहुमताने आजपर्यंत विजय संपादन करता आलेला नव्हता तर मावळते सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला ८ , कॉंग्रेसला ६, समाजवादी पक्षाला २, बसपला १, शिवसेनेला १, लोकसंग्राम पक्षाला १, अपक्षाला एक जागा मिळाली. यात एमआयएम’ने ४ जागांवर विजय मिळवत महापालिकेत प्रवेश केला.

2 Comments

Click here to post a comment