चंद्रकांतदादांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील १६ भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करावी- धनंजय मुंडे

dhananjay munde and chandrakant dada patil

मुंबई: सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली. भुजबळांच्या बाजूला दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत, असा इशारा चंद्रकांतदादांनी अजित पवारांना दिला. धनंजय मुंडे चंद्रकांतदादांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.

धनंजय मुंडे म्हणाले, ज्या ज्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन करते त्या त्या वेळी सरकार सत्तेचा वापर करून आम्हाला धमकी देण्याचे काम करते,चंद्रकांत दादा यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळातील १६ भ्रष्ट मंत्र्यांच्या कोठडीची सोय करून ठेवावी. असे धनंजय मुंडेनी खडसावले. हल्लाबोल यात्रेदरम्यान त्यांनी पंढरपूर येथे प्रतिक्रिया येथे प्रतिक्रिया दिली.Loading…
Loading...