संजय शिंदेना आमदार करणे हेच माझे ध्येय : चंद्रकांत सरडे 

करमाळा- आगामी विधानसभेला जि प अध्यक्ष संजय मामा शिंदे यांना आमदार करणे हेच माझे एकमेव ध्येय असल्याचे प्रतिपादन करमाळा बाजार समितीचे नवनिर्वाचीत संचालक चंद्रकांत सरडे यांनी केले.

करमाळा बाजार समिती निवडणूकीत किंगमेकर ठरलेले आणि शिंदे गटाकडून एकमेव निवडून आलेले उमेदवार चंद्रकांत सरडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना सांगितले की सध्या दोन्ही गट म्हणजे बागल गट आणि पाटील-जगताप गटांकडून मला सभापती पदाची अॉफर असून आपण आम्हालाच पाठिंबा द्यावा यासाठी तिन्ही गट प्रयत्नशील आहेत, परंतु सभापती होणे हे एकमेव धोरण नसून आगामी विधानसभेला संजय मामांना आमदार करणे हेच एकमेव धोरण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बागल गटाने संजय शिंदे गट सोडून सोबत येण्याबद्दल देखील ऑफर दिली असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला मात्र मी कोणत्याही परिस्थितीत संजय शिंदे यांच्याच सोबत राहणार असल्याचं त्यांना  ठणकावून सांगितल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. बाजार समितीच्या सभापती निवडणूकीत कुठल्या गटांबरोबर जायचे हा अंतिम निर्णय शिंदे गटाचे संजय शिंदेच घेतील तसेच सभापती पद मिळालेच तर आपण युती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.