मी पोस्टाच्या कोऱ्या पाकीटासारखा, पक्ष पत्ता टाकेल तिथे जाईन !

टीम महाराष्ट्र देशा: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपमध्ये खांदेपालट करण्यात आले आहेत. रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी सकाळी राजीनामा देताच महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाचावर वर्णी लागली आहे, आपल्या निवडीवर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी आपण पोस्टाच्या कोर्‍या पाकिटासारखे असून त्यावर जो पत्ता टाकाल त्यावर जाईन, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

विद्यार्थी चळवळीतून राजकीय जीवनाला सुरुवात करणारे चंद्रकांत पाटील यांचा प्रदेशाध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास खडतर राहिलेला आहे. पाटील यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जाते, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांसह अनेक महत्वाची खाती त्यांनी सांभाळली आहेत. मराठा आरक्षणा संदर्भातील निर्णय प्रक्रियेत त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे.

Loading...

दरम्यान, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम अंगावर घ्या, म्हणजे क्षमतेपेक्षा अधिक काम तुमच्या हातून होईल, असे माझे गुरू यशवंतराव केळकर यांनी सांगितले होते. मी त्यांच्या शिकवणुकीनुसार वाटचाल करीत असून, भाजपच्या नितीन गडकरी यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत सर्वच नेते त्याच गुरुमंत्रानुसार काम करतात, असे पाटील म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
‘सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षातील भूमिकेतून बाहेर यावं’