त्यांनी माझी मानसिकता तपासली तर मी त्यांचं…; चंद्रकांत पाटलांचं राऊतांना प्रत्युत्तर

त्यांनी माझी मानसिकता तपासली तर मी त्यांचं…; चंद्रकांत पाटलांचं राऊतांना प्रत्युत्तर

Sanjay Raut and Chandrakant Patil

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांची माफी मागत वादग्रस्त कृषी कायदे रद्द केले आहेत. पंतप्रधानांच्या या निर्णयानंतर विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायदे मागे घेण्याबाबत वक्तव्य केलं होतं.

कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच होते. पंतप्रधानांना हे नाईस्लास्तव रद्द करावे लागले, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रावर टीका केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सडकून टीका केली.

‘चंद्रकांत पाटलांना शतेकरी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत तो शोक, दुःख वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल. मी त्यांना शोकसंदेश पाठवतो. आपण त्यांच्यासाठी शोकसभा घेऊ’, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. दरम्यान आता चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.

संजय राऊत सार्वजनिक बोलले, मात्र मी समोर असताना बोलले नाहीत. संजय राऊत डॉक्टर आहेत. त्यामुळे मी वेगळा डॉक्टर न शोधता त्यांच्याकडेच जातो म्हणजे आमचा जरा संवाद देखील होईल. नवाब मलिक, संजय राऊत काहीही संदर्भ नसलेलं खोट का बोलत आहात, असा संवाद यावेळी करता येईल. यावेळी संजय राऊतांनी माझी मानसिकता तपासली तर मी त्यांचं डोकं तपासेल, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे.

महत्वाच्या बातम्या