…मी अस म्हंटलचं नव्हत, असे म्हणत चंद्रकांत पाटलांची नितेश राणेंंबाबतच्या वक्तव्यावरून पलटी

चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : आ. नितेश राणे यांच्यावर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करा असे मी म्हंटलचं नव्हत, असे म्हणत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नितेश राणे यांच्याबाबतच्या वक्तव्यावरून पलटी मारली आहे. नारायण राणे यांनी खुद्द मला मुलाच्या बचावासाठी फोन केला होता. मात्र मी त्यांना नकार दिला. आणि नितेश राणे यांच्यासह समर्थकांवर खुनाचा प्रयत्न केला असे कलम लावा असे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले, असे त्यांनी प्रशासकीय अधिकारी प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांना सांगितले होते. मात्र आता पाटील यांनी मी अस म्हंटलोच नसल्याच सांगत पलटी मारली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी नितेश राणे यांच्या चिखल फेकीनंतर प्रकाश शेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये चंद्रकांत पाटील यांनी नितेश राणे यांच्या विरोधात खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करा, असे म्हंटल्याच दिसत आहे. नारायण राणे यांनी खुद्द मला मुलाच्या बचावासाठी फोन केला होता. मात्र मी त्यांना नकार दिला. आणि नितेश राणे यांच्यासह समर्थकांवर खुनाचा प्रयत्न केला असे कलम लावा असे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले, असे पाटील म्हणाले.

दरम्यान आमदार नितेश राणे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गाचे उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना गडनदी पुलावर बांधत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या होत्या. एवढंच नव्हे तर सर्वसामान्य नागरिक रोज जो चिखल मारा सहन करत आहे, तो तुम्ही पण आज अनुभवावा, असं म्हणत त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या स्वभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून ओतण्यात आल्या. या चिखलफेकीच्या प्रकरणानंतर राणे यांना अटक करण्यात आली. तसेच त्यांना न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली.Loading…
Loading...