चंद्रकांत पाटलांकडे कृषिमंत्रीपदाची जबाबदारी

मुंबई : पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेले कृषि व फलोत्पादन मंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी परदेशी जाण्यापूर्वी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविली आहे. पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देखील आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची चर्चा आहे. त्यावेळी कृषिमंत्रीपदी भाजपच्या दुसऱ्या एखाद्या नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी वरिष्ठ आयएएस तसेच आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्यांना देखील मान्यता दिल्याचं वृत्त आहे.

You might also like
Comments
Loading...