मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी वाजे यांनी केलेल्या आरोपातून राज्यकर्तेच संघटित गुन्हेगारीमध्ये गुंतल्याचे दिसत आहे. या प्रकरणी ज्यांचे उल्लेख होत आहेत, त्यांचे राजीनामे पुरेसे नसून संबंधितांविरुद्ध मोक्का अन्वये गुन्हे दाखल करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खा.प्रताप पाटील चिखलीकर, आ.राहुल नार्वेकर, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक, माजी खा. किरीट सोमय्या, प्रदेश सचिव संदीप लेले या प्रसंगी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, परमबीर सिंग, वाजे या पोलीस अधिकाऱ्यांकडून जी माहिती समोर येत आहे, ती अत्यंत धक्कादायक आहे.या बाबतचे सबळ पुरावे सादर झाले तर या प्रकरणी संबंधित व्यक्तींच्या विरोधात संघटित गुन्हेगारी च्या (मोक्का) कलमाखाली गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे. सामान्य माणसाला जो न्याय लावला जातो तोच न्याय या प्रकरणात नामोल्लेख झालेल्यांना लावावा. वाजे यांनी केलेल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडण्याऐवजी मंत्री अनिल परब यांनी एनआयए, सीबीआय समोर जाऊन स्पष्टीकरण द्यावे,असेही पाटील म्हणाले.
अनिल परब यांच्यावर काय आरोप?
सचिन वाझेंनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर आरोप केलाय की एसबीयुटी प्रकल्पाच्या ट्रस्टींकडून ५० लाख रुपये मागितले. त्यांनी दुसरा आरोप केलाय की जानेवारी २०२१ला मुंबई पालिकेच्या कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. परंतु या दोन्ही गोष्टी धादांत खोट्या आहेत असे म्हणत अनिल परब यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिनेत्री प्रिया बापटची पहिली पोस्ट, म्हणाली…
- मविआ मंत्र्यांचा केंद्र सरकारविरोधात टाहो; मात्र पवार म्हणाले, केंद्र राज्याला सहकार्य करतंय
- …पण पवार साहेबांना खोट पाडू नका; भाजप नेत्यानेच केलं मविआ नेत्यांना आवाहन
- पोलिसच बॉम्ब ठेवतायत हे जगातील पहिलच उदाहरण असेल – प्रकाश जावडेकर
- ‘पंतप्रधान आणि गृहमंत्री बंगालला खोटी स्वप्न दाखविण्यात व्यस्त आहेत’