fbpx

१५ ते २० ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुकीची शक्यता

मुंबई : सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकारकडून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने आज बैठक घेतली. या बैठकीनंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखेचा अंदाज व्यक्त केला.

चंद्रकांत पाटलांनी दिलेल्या माहितीनुसार, “९ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहेत. २०१४ मध्ये १५ ऑक्टोबरला मतदान झालं होतं. त्यामुळे यंदा १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल असं म्हटलं. लोकसभा निवडणूक यशाच्या पार्श्वभूमीवर आणि दुष्काळ आढावा घेणारी आणि विधानसभा निवडणूक योजना करण्यासाठी आज भाजपची बैठक झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं