fbpx

दुष्काळग्रस्त भागातील मुलींच्या शिक्षणासाठी चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

चंद्रकांत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : राज्याला यंदा भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जो तो आपल्या परीने शक्य होईल तितकी मदत दुष्काळग्रस्त भागात करत आहे. त्याचं प्रमाणे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थीनिंना मोफत नऊ महिन्यांचा पास, गणवेशासाठी कापड आणि बूट देणार असल्याची घोषणा केली आहे.

राज्यातील अनेक जिल्हे हे भीषण दुष्काळाने होरपळत आहेत. पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष आणि नेते दुष्काळग्रस्त भागात पाहणी करत आहेत. आणि आपल्या परीने होईल तितकी मदत करत आहेत. तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळग्रस्त मुलींच्या शिक्षणासाठी, कपडे आणि बूट, चप्पल यांसाठी निधी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आतापर्यंत २० लाख रुपये संकलित झाले आहेत. या साठलेल्या पैशातून दुष्काळग्रस्त भागातील मुलींच्या शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे.