चंद्रकांत पाटलांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला: धनंजय मुंडे

chandrakant patil

टीम महाराष्ट्र देशा: ‘हुट्टीदरे कन्नड नाडू हुट्टू बेकू’ (जन्माला यायचे तर कर्नाटकातच जन्म घ्यावा) हे शब्द आहेत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटनाला हजेरी लावली. तेव्हा चंद्रकांत दादांनी हे कर्नाटकचे गोडवे गायले आहेत.

आता यावर “महाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम ज्ञात होते, आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी” अस ट्विट करत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला आहे.