जळगाव: माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये शाब्दिक वाद नेहमी होत असताना पाहायला मिळतात. आता यांच्यातील राजकीय दुष्मनिवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. आज ते अजिंठा विश्रामगृहातील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय दुष्मनिवर पाहता त्यांच्यात शाब्दीक वाद होतच राहतील आणि खडसेंनी डिवचल्याशिवाय चंद्रकांत पाटील चांगले काम करणार नाहीत. अशा शब्दात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुक्ताईनगरातील राजकीय वादावर खुसखुशीत भाष्य केले. तर खडसेंनी महाविकास आघाडीत कितीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला तर पवार आणि ठाकरे याला साखरमध्ये परिवर्तीत करतील, असा आशावादही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
महत्वाच्या बातम्या –