भाजप नेते चंद्रकांत पाटील उतरणार प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात ?

टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप युतीसाठी चांगले वातावरण असल्याने भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्य्क्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच दिसत आहे. याबाबत खुद्द चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले आहेत. पक्षाने आदेश दिला तर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचं पाटील यांनी आज पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात स्पष्ट केलं. चंद्रकांत पाटील यांनी आत्तापर्यंत थेट निवडणूक कधीच लढविलेली नाही.

लोकसभा निवडणुकीत भाजप युतीला मिळालेले यश आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेली मोर्चेबांधणी या निकषांवरून भाजपला विधानसभेतही यश मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे अनेक नेते भाजपच्या या विजयी गंगेत आपले हात धुवून घेयचा तयारीत आहेत. तर आता खुद्द चंद्रकांत पाटील देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील हे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे विश्वासू आहेत.तसेच पाच वर्षांपर्यंत दादा हे कायम पडद्यामागे राहूनच संघटनेचं काम करत आहेत. मात्र भाजपची सत्ता आल्यानंतर दादांना मंत्रिमंडळात मोठ स्थान देण्यात आलं. तेव्हापासून दादांचं वजन भाजपमध्ये चांगलंच वाढलं आहे. त्यामुळे भाजप श्रेष्ठी चंद्रकांत पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याचं दिसत आहे.