‘चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झाला आहे’

chandrakant patil vs hasan mushrif

कोल्हापूर : कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असं खुलं आव्हान देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी शड्डू ठोकला आहे.

यावरूनच राज्याचे मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पातळ्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही, त्यामुळे कुणी राजीनामा द्यायचा प्रश्न नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत, त्यामुळे त्यांनी येथून निवडणूक लढवली तर त्यांचा डिपॉझिट जप्त होईल. त्यामुळे चंद्रकांत पाटलांचा जन्म हिमालयात जाण्यासाठी झाला आहे,’ असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील करणार शरद पवारांवर पीएचडी !

‘राजकारणात येण्यापूर्वी मला शरद पवार मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर समजले की, ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,’ अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यानंतर आता त्यांनी, ते वक्तव्य व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हतं, तर सर्वांबद्दल होतं असं म्हटलं आहे. तसंच आपण शरद पवारांवर पीएचडी करत असल्याचा खुलासा केला आहे.

दरम्यान, ‘शरद पवार देशाचे आणि राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. 50 वर्षांहून अधिक त्यांचा राजकीय प्रवास आहे. देशातील आणि राज्यातील असा एकही प्रश्न नसेल जो त्यांना माहित नाही. त्यांनी उभी हयात जनतेच्या हितासाठी, विकासासाठी घालवली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील जर पवार साहेबांवर पीएचडी करत असतील तर आम्हाला आनंदच आहे.’ असं देखील हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या