म्हणून … चंद्रकांत पाटलांना करायची आहे शरद पवारांवर पी. एचडी

टीम महाराष्ट्र देशा : भाजपही देशावरील आपत्ती आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर प्रतिक्रिया देताना केली होती, यावर उत्तर प्र्युत्तर देताना ‘ मागील पन्नास वर्ष राजकारणात असूनही दहाच्या वर खासदार निवडून आणता नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला. “शरद पवार यांची प्रतिक्रिया फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते 50 वर्ष राजकारणात आहेत, तरीही त्यांचा पक्ष दहापेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र राजकारणात ते कायम केंद्रबिंदू असतात. ते कसे काय?’ असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटलांनी टोमणा मारला.

Loading...

ते पुढे म्हणाले,’ ‘शरद पवार एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपलं म्हणणं कसं काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे’ असं चंद्रकांत पाटील तिरकसपणे म्हणाले.

याआधी, दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेखी मिरवू नये, ‘आम आदमी पक्षा’ला मिळालेल्या यशात त्यांचं काहीही योगदान नाही, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. दिल्लीच्या निकालाचा टेंभा शिवसेनेनेही मिरवू नये. काँग्रेसने शरणागती पत्करली, त्यामुळे ‘आप’चा विजय झाला. शरद पवार आणि शिवसेनेने भाजपला खिजवण्याचं काम करु नये, असं चंद्रकांत पाटलांनी सुनावलं होतं.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण
बांगड्यांच्या वादात अमृता फडणवीसांची उडी, आदित्य ठाकरेंवर केला पलटवार
अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
गावितांची 'हीना' होणार 'वळवींची' सून ; खासदार हीना गावितांचा झाला साखरपुडा
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन