मुंबई: भाजपच्या नेत्यांकडून महविकास आघाडीच्या विविध नेत्यांवर आरोप केले जात आहे. आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करुणा शर्मा प्रकरणावरून टीका केली आहे. “करूणा शर्मा यांच्यासोबत संबंध असल्याचे आणि त्यांच्यापासून आपल्याला अपत्य असल्याचे धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे मान्य केले, त्यामुळे त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन लग्न झाल्याचा खुलासा करायला हवा होता” असे चंद्रकांत पाटील यांनी या ट्विट मध्ये म्हणले आहे.
करुणा शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले होते. “धनंजय मुंडे याला त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे. ते मंत्री आहेत तर त्यांच्या घरचे असतील” अश्या शब्दात त्यांनी मुंडेंवर हल्लाबोल केला होता. दरम्यान बीड मधून मुंडेंविरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचेही त्या म्हणाल्या होत्या. शर्मा यांनी सांगितले कि, “माझा निवडणूक लढवण्याचा कोणताही विचार नव्हता. परंतु मी पत्रकार परिषद घेऊन आले तेव्हा अनेक लोक, उमेदवार मला भेटले. निवडणुकीला मी उभं राहावं अशी सर्वांची इच्छा आहे. आज इतके पक्ष आहेत आणि १३ कोटी जनता आहे पण परमबीर सिंग सारख्या व्यक्तीला देश सोडून जावं लागलं. आज इतका भ्रष्टाचार सुरु असून कोणीही आवाज उठवत नाही. मी आवाज उठवला असून निवडणुकीला उभं राहण्याचा मला अधिकार आहे”.
आता मात्र करुणा शर्मा या बीडमधून नव्हे तर कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांनी असा निर्णय का घेतला हे मात्र स्पष्ट झालेले नाही. आता करुणा शर्मा खरंच निवडणुकीला उभ्या राहणार का लवकरच कळेल.
महत्वाच्या बातम्या:
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<