संजय राऊत विरोधात केंद्रीय महिला आयोगाला पत्र पाठवणार-चंद्रकांत पाटील

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर चित्रपट निर्मात्या महिलेने केलेल्या आरोपासंदर्भात केंद्रीय महिला आयोगाला पत्र पाठवणार असल्याचे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. संजय राऊत हे आपला छळ करत असल्याचा आरोप चित्रपट निर्मात्या डॉ. स्वप्ना पाटकर यांनी सोशल मीडियावरून केला आहे. डॉ.स्वप्ना यांनी एक पत्र लिहिले आहे आणि पोस्ट करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांना टॅग करत मदतीची मागणी केली आहे. या मुद्यावरुन चंद्रकांत पाटील संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.

स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत मागच्या ८ वर्षांपासून पक्षाचे वजन वापरून शिवीगाळ करत असल्याचा आरोप या पत्रात केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा आणि नातेवाइकांचाही छळ करत असल्याचे म्हटले आहे. मला मारून टाकण्याआधी न्याय मिळावा अशी अपेक्षा देखील त्यांनी या पत्रातून व्यक्त केली आहे. हे प्रकरण मिटवण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली असल्याचा आरोपही पाटकर यांनी केला आहे.

संजय राऊत अनिल परब यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, राजकारणात शेवटपर्यंत लढाई लढाईची असते, पण ती सत्याच्या बाजूने. आपल्या चूक असलेल्या कार्यकर्त्याला पाठिशी घालायचे नसते असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या :