रस्ते घोटाळ्याबाबत चंद्रकांत पाटलांची तक्रार लाचलुचपतकडे करणार-हसन मुश्रीफ

chandrkant vs hasan

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये अडकले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान आज भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींच्या भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. तसेच त्यांचा मुलगा नाविद हसन आणि पत्नीवर देखील आरोप केले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

तर याला उत्तर देताना आता हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरच भ्रष्टाचारचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन थेट चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करणार असल्याचंही जाहीर केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले कि, ‘चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करणार आहे.

राज्यातील 90 टक्के रस्ते बंद आहेत. कंत्राटदार पळून गेले आहेत. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. कायदेशीर सल्ला घेऊन अँटी करप्शनमध्ये त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहे.’ असे विधान आता हसन मुश्रीफ यांनी आता केले आहे. तसेच सोमय्या हे माझी प्रतिमा डागळण्यासाठीच बोलत आहेत. माझ्यावर जेव्हा जेव्हा असे आरोप केले तेव्हा तेव्हा आरोप करणाऱ्यांवर मी 50 कोटींचे दावे केले आहेत. आता सातवा दावा करणार आहे आणि तो दावा 100 कोटींचा करणार आहे. अशी माहिती देखील त्यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :