सभागृहातच चंद्रकांत पाटील माझ्यावर धावून आले ; कपिल पाटलांचा आरोप

टीम महाराष्ट्र देशा : चंद्रकांतदादा माझ्या अंगावर धावून आले. त्यांना दोन ते तीन मंत्र्यांनी पकडून ठेवले. अक्षरश: अंगावर धावून आले. तुला बघून घेतो, बदडून काढतो, अशी धमकी राज्याचे महसूलमंत्री देत असतील, तर परिस्थिती गंभीर आहे.”, असा धक्कादायक आरोप आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.

Loading...

दरम्यान, प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. प्रशांत परिचारक यांच्याबद्दल प्रश्न विचारल्याने महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आपल्या अंगावर धावून आले, त्यांनी ‘मी तुला बघून घेईन’ अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केला आहे.

प्रशांत परिचारकरांनी जो शब्दप्रयोग केला, ती परंपरा या सरकारला मान्य आहे का? हा माझा प्रश्न आहे. त्याचा खुलासा सरकारने करावा. या विचारधारेचं समर्थन करतं की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे. ते स्पष्ट करण्याऐवजी ज्याप्रमाणे चंद्रकांतदादा सभागृहात भाषा वापरत होते, खेदजनक आणि वेदनाजनक होती.”, असे कपिल पाटील म्हणाले.Loading…


Loading…

Loading...