कर्नाटक गौरव गीत गाणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा-अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा: ‘हुट्टीदरे कन्नड नाडू हुट्टू बेकू’ (जन्माला यायचे तर कर्नाटकातच जन्म घ्यावा) हे शब्द आहेत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील तवग गावातील दुर्गादेवी मंदिराच्या उद्घाटनाला हजेरी लावली. तेव्हा चंद्रकांत दादांनी हे कर्नाटकचे गोडवे गायले आहेत.

आता यावर बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकाचे गोडवे गाणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. तसंच त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध अजित पवार यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाण्याची ओळ म्हटल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकात नाराजीचे वातावरण पसरलं आहे. कन्नड गाण्याची ओळ सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

Loading...